पाणी आणताना पाय घसरून विहिरीत पडलेल्या पुतणीला वाचवताना काका आणि पुतणी असा दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रणधुळगाव येथे घडली आहे.या घटनेत माजी सैनिक असलेले मनोज भास्कर शेसवरे (वय ४३) आणि सौंदर्या वैभव शेसवरे (१६, दोघेही रा. अग्रण धुळगाव)हे मृत्त झाले आहेत. मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला. कवठेमहांकाळ पोलिसात घटनेची नाेंद झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अग्रण धुळगाव येथील शेसवरे मळा येथे राहत असलेल्या सौंदर्या व तिची आई घराच्या पाठीमागे असलेल्या त्यांच्या विहिरीमध्ये पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. मायलेकी दोघीही विहिरीत उतरल्या होत्या.विहिरीत कळशी घेऊन वर्ती येत असताना सौंदर्याचा पायरीवरून पाय घसरला आणि ती विहिरीत पडली.सौंदर्या विहिरीतील पाण्यात पडताच तिच्या आईने आरडाओरडा केला.
आवाज ऐकून सौंदर्याचा चुलते असलेले मनोज शेसवरे हे धावत विहिरीकडे आले. सौंदर्याला वाचवण्यासाठी त्यांनी विहिरीत उडी मारली.पाण्यामध्ये आल्यावर गटांगळ्या घेत असलेल्या सौंदर्याने पाण्यामध्ये काका मनोज यांना मिठी मारली.मात्र सौंदर्याने घट्ट मिठी मारल्याने मनोज शेसवरे यांना हातपाय हलवता आले नाहीत.त्यामुळे त्यांना पोहता आले नाही,त्यामुळे सौंदर्यांने भितीने काका मनोजला एकदम घट्ट पकडल्याने दोघेही विहिरीत बुडाले.दोघेडी बुडताना सौंदर्याच्या आईने परत आरडाओरड केला,शेजारी असलेल्या वस्तीवरील ग्रामस्थ विहिरीकडे धावले मात्र तोपर्यत फारच उशीर झाल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला.कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दोघांच्या मृत्तदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कवठेमहांकाळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पुन्हा पाय घसरल्याने विपरित घडलेकाकांनी बुडालेल्या सौदर्या हिला पाण्यात बुडून बाहेर काढले.विहिरीच्या पायरीवरुन सौदर्याला उचलून घेऊन वर येत असताना मनोज यांचा पाय घसरल्याने पुन्हा दोघेही पाण्यात पडले.भितीने सौदर्याने काका मनोज यांना एकदम घट्ट मारलेली मिठी आणि थकव्यामुळे मनोज यांना अखेर श्वास सोडावा लागला.त्यामुळे त्यांना वर्ती येता आले नाही.मनोज हे भारतीय सैन्यात नोकरीस होते.काही वर्षापूर्वीच ते निवृत्त झाले होते.दुर्देवाने पोहता येत असूनही त्यांनाही प्राण गमवावा लागला आहे.