संजय घोडावत इन्स्टिट्यूटमार्फत “इंजिनिअरिंगचा ऑप्शन फॉर्म भरणे आणि कॅप राऊंड” या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

0
Rate Card
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमार्फत “इंजिनिअरिंगचा ऑप्शन फॉर्म भरणे आणि कॅप राऊंड” या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

कोल्हापूर :  महाराष्ट्र राज्य आभियांत्रिकी (बी.ई. आणि बी. टेक इंजिनिअरिंग) प्रवेश २०२३-२४ सामायिक प्रवेश परीक्षा (CET सीईटी ) अंतर्गत प्रथम वर्ष आभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी चालू असलेल्या कॅप राऊंड-१ साठी ऑप्शन फॉर्म कसा भरावा? या विषयावर इंजिनिअरिंग ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दिनांक २० जुलै २०२३ रोजी सकाळी  ठीक. १०:०० वा. राजश्री शाहू स्मारक भवन,  कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे, या मार्गदर्शन कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी व पालकांना संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट व्ही. गिरी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.

इंजिनिअरिंग प्रवेशाच्या या मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये: मेरिट लिस्ट विश्लेषण, शीट डिस्ट्रीब्यूशन मॅट्रिक्स, स्टेप इन फिलिंग ऑप्शन फॉर्म व स्टेट एक्सेप्टेशनस रुल्स : या प्रवेशासंदर्भातील महत्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. इंजिनिअरिंग चे फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे देखील या मार्गदर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून शेवटी दिली जाणार आहेत.

आपणांस कळविण्यात आनंद होत आहे कारण, नुकताच संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर ला ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) नवी दिल्ली यांनी पदवी इंजिनिअरिंग च्या अभ्यसक्रमास मान्यता मिळालेली आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ पासून संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये पदविका अभियांत्रिकी सोबतच पदवी अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया देखील सुरवात झाली आहे. विषेश करून यामध्ये  मेकॅनिकल इंजिनिअरिंग,सिव्हिल इंजिनिअरिंग,  इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग च्या शाखा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.

संजय घोडावत इन्स्टिट्यूट डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठ, लोणेरे यांच्या सोबत संलग्न असून शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून पदविका सोबत पदवी अभ्यासक्रमासाठी  केंद्रीय प्रवेश प्रक्रियानुसार येथे प्रवेश देण्यात येणार असून, यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सर्व शासकीय शिष्यवृत्ती देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध असणार आहेत, इथून पुढे संजय घोडावत इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून आम्ही समाजातील प्रत्येक घटकांना उत्कृष्ट,दर्जेदार शिक्षण आणि तेही माफक फी मध्ये आमच्या जागतिक दर्जाच्या संकुलनात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहोत.

या मार्गदर्शन कार्यक्रमात इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या ग्रामीण व शहरी  भागातील सर्व  विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संजय घोडावत इन्स्टिट्यूट मार्फत आपणा सर्वांना करण्यात येत आहे.

अशा प्रकारे या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाच्या आयोजन केल्याबद्दल, संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष, श्री संजयजी घोडावत, विश्वस्त श्री. विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

 संजय घोडावत इन्स्टिट्यूट प्राचार्य, डॉ. विराट व्ही. गिरी.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.