जतकरांच्या सुखः दुखात खा.पाटीलच, त्यामुळेच मोठे मताधिक्य मिळणार | प्रकाशराव जमदाडेंचा विश्वास

0
13
जत : गेल्या दहा वर्षांपासून खासदार संजय पाटील यांनी जत तालुक्याच्या सिंचनासह अनेक कामांना पहीले प्राधान्य दिले आहे. म्हणूनच सलग दोन टर्म जत तालुक्याने त्यांच्यावर मोठा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी देखील खा.पाटील यांना जत तालुक्यातून मतांची मोठी आघाडी मिळेल असा विश्वास जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी व्यक्त केला.सांगली लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार खा. संजय पाटील यांच्या प्रचारार्थ प्रकाशराव जमदाडे यांनी तालुक्यातील शेगाव, बनाळी, वाळेखिंडी, उमराणी, डफळापूर, उमदी, करजगी, भिवर्गी, बेळोंडगी, सोन्याळ, माडग्याळ, उटगी, अंकलगी, तिकोंडी आदी भागात दौरा करत मतदारांशी संवाद साधला. अनेक भागात कोपरा सभा घेत गेल्या दहा वर्षात खा.पाटील यांनी केलेली कामगिरी मतदारांना पटवून दिली. त्यांच्या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळला.
यावेळी सरदार पाटील, भैय्या कुलकर्णी, विठठल निकम, रवी सावंत, रामण्णा जिवणाबर, शिव तावंशी,अँङ बाळ निकम, – दिग्वीजय चव्हाण, योगेश व्हनमाने, चिदानंद चौगुले, मिलींद पाटील, चिदानंद चौगुले, मंगेश सावंत यांच्यासह मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
जमदाडे म्हणाले, खासदार संजय पाटील खऱ्या अर्थानी दुष्काळी भागाचे भगिरथ ठरले आहे. जत तालुक्याला गरज असणाऱ्या मुळ म्हैसाळ योजनेला काकांनी मोठी गती दिली. नितीन गडकरी यांच्या माध्यमातून थेट केंद्रातून पंतप्रधान कृषी सिंचई योजना आणि बळीराज जलसंजीवनी योजनेतून २१०० कोटींचा निधी आणला. यातून बंदीस्त पाईप लाईनची कामे गतीने पूर्ण करता आली आहेत.

 

या निधीमुळे आज पूर्वेच्या उमदी पर्यंत, तिकडे बिळूर, एकूडी, डफळापूर, उत्तरेला शेगाव, बनाळी, वायफळ अंतराळ या भागात पाणी पोहचले. इतकेच नाही तर माडग्याळसह आठ गावे आणि दोडडनाला तलाव भरण्यासाठी काकांनी तीन महीने अहोरात्र पाठपुरावा करत तातडीने अतिरीक्त कॅनॉल खुदाई करून दोडडनाला मध्यम प्रकल्पात पाणी आणले. यामुळे यंदाच्या भीषण टंचाईवर मात करण्यात यश आले.

 

 

अंकलगीसाठी २६ कोटींचा निधी
अंकलगी, गुडडापूर, व्हसपेठ, संख या भागासाठी देखील नैसर्गिक पध्दतीने पाणी नेण्यासाठी २६ कोटींची टेंडर प्रक्रीया राबवण्यात आली आहे. लवकरच या कामाला सुरूवात होवून या भागाला दिलासा देण्यात येणार आहे. त्याच सोबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करून आज म्हैसाळ विस्तारीत योजनेला गती आणली आहे. एक हजार कोटींची कामे प्रगतीपथावर आहेत. काकांनी या योजनेसाठी २०२० सालीच अंकलगी येथे बैठक घेवून ही योजना साकारण्याची घोषणा करत ती पूर्ण केली आहे.
जत तालुका देशाच्या नकाशावर
राज्यातला दुष्काळी व अविकसीत असणारा तालुका काकांनी चार नॅशनल हायवेच्या माध्यमातून देशाच्या नकाशावर आणला आहे. विजापूर गुहागर, उमदी। नगर, जत सांगोला हे राष्ट्रीय महामार्ग पूर्णत्वास गेले आहेत. आणखीन चार नवे प्रस्ताव देखील असून, ती देखील पूर्ण होणार आहेत. या दळण वळणातून जत तालुक्याच्या विकासाला मोठी गती मिळत असल्याचेही जमदाडे यांनी स्पष्ट केले.
जतची सुख दुःख जपणारा एकमेव खासदार 
जत तालुक्यावर काकांनी अपार प्रेम केले. गावोगावी थेट संपर्क, कसलेही गटातटाचे राजकरण न करता काकांनी तालुक्यातील सर्व पक्षीयांची कामे केली आहेत. त्यामुळे यावेळी देखील काकांना मोठे मताधिक्य मिळेल. गेल्या सत्तर वर्षात जत तालुक्याच्या सुख दुखात समरस होणारे संजयकाका पहीले खासदार आहेत. त्यांना तिसऱ्यांदा केंद्रात पाठवून मंत्री करणे आणि सांगलीच्या विकासाला पुन्हा गती देण्याची जबाबदारी जनतेनी पार पाडावी, असे आवाहनही प्रकाशराव जमदाडे यांनी केले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here