जत : भाजपचे लोकसभेचे उमेदवार खा. संजय पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे आज, शनिवारी (दि. ४) जतच्या दौऱ्यावर येत आहेत.जत येथील बाजार समितीच्या प्रांगणात सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही सभा होणार आहे, अशी माहिती भाजप व मित्रपक्षाच्या संयुक्त पत्रकार बैठकीत जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे, भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. रवींद्र आरळी, भाजपचे विधानसभा प्रमुख तम्मनगौडा रवी-पाटील यांनी दिली.
यावेळी युवा नेते संजय तेली,अँड. प्रभाकर जाधव, सरपंच शिवाप्पा तावशी, रवींद्र सावंत, चिदानंद चौगुले, अनिल पाटील, तानाजी पाटील, योगेश व्हनमाने, चंद्रकांत गुड्डोडगी, रासपाचे जिल्हाध्यक्ष किसन टेंगले, मारुती सरगर, लक्ष्मण पुजारी, बसवराज पाटील, एकुंडीकर आदी उपस्थित होते.
तसेच रविवारी (दि. ५) सकाळी ८.३० वाजता मिरजेत ‘विकसित भारत २०४७’ या विषयावर संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे हा कार्यक्रम होईल.नितीन गडकरी हे या सभेला संबोधित करतील.