पत्नी मालमत्तेसाठी किती निष्ठूर बनू शकते,याचा प्रत्यय तेलंगणातील एका कॉफी व्यावसायिकाच्या हत्येचे गूढ कर्नाटक पोलिसांनी उकलले आहे. कोडागु येथील कॉफी इस्टेटमध्ये रमेश नावाच्या या व्यक्तीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणी रमेशच्या दुसऱ्या पत्नीसह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आठ कोटी रुपयांची मालमत्ता हडप करण्यासाठी महिलेने पतीची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह ८४० किमी दूर नेऊन जाळण्यात आला. रमेशने एक मालमत्ता विकली होती, त्याचे ८ कोटी मिळवण्यासाठी पत्नीने रमेशच्या हत्येचा कट रचला. गुन्ह्यात वापरलेल्या कारद्वारे पोलिस रमेशच्या घरापर्यंत पोहोचले. यानंतर पोलिसांनी रमेशची दुसरी पत्नी निहारिका आणि त्याचे दोन मित्र डॉ. निखिल आणि अंकुर राणा यांना अटक केली.
पत्नीने मित्रांची घेतली मदत
निहारिकाने मित्र अंकुर राणाला १ ऑक्टोबरला हैदराबादला येण्यास सांगितले. ३ ऑक्टोबरला तिने पती रमेश कुमारलाही हैदराबादला बोलावले. नंतर निहारिकाने अंकुरला सोडण्याचे सांगत पती रमेशसोबता गाडीत बसली. वाटेत अंकुर आणि निहारिकाने रमेशचा गळा आवळून खून केला. नंतर दोघेही बंगळुरू येथील होरामवू येथे गेले. दोघांनी दुसरा मित्र निखिलला तेथे बोलाविले. सुतीकोपा येथील पन्या इस्टेटमध्ये मृतदेह जाळला.
रमेश हा निहारिकाचा तिसरा नवरा २९ वर्षीय निहारिका ही तेलंगणातील मोंगीर येथील रहिवासी आहे. ती १६ वर्षांची असताना वडिलांचे निधना झाले. यानंतर आईने दुसरे लग्न केल्यानंतर निहारिकाचेही लग्न झाले. पुढे तिचा घटस्फोट झाला.. निहारिका ही अभियांत्रिकी पदवीधर असून तिने अनेक कंपन्यांमध्ये काम केले आहे. रमेश हा निहारिकाचा तिसरा नवरा होता. घटस्फोटानंतर तिने हरयाणातील एका व्यक्तीशी लग्न केले. मात्र, तिच्या पतीने तिला फसवणुकीच्या गुन्ह्यात तुरुंगात पाठवले. तिने तुरुंगात राणाच्या आईची भेट घेतली. पुढे तिची अंकुर राणाशी मैत्री झाली. सुटकेनंतर ती बंगळुरूला परतली आणि २०१८ मध्ये रमेशशी लग्न केले. रमेश यांनी आठ कोटींची मागणी फेटाळल्याने वाद सुरू झाला. निहारिकाने पतीची हत्या केली आणि नंतर बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली,अशी माहिती पोलीसांनी दिली.