शिवप्रताप मल्टीस्टेटच्या सेवाविस्ताराला नवी दिशा

0
9

विटा : ग्राहकांना आधुनिक, पारदर्शक व विश्वासार्ह सेवा देण्याच्या उद्देशाने शिवप्रताप मल्टीस्टेटच्या मुख्य शाखेत नव्याने सुरू करण्यात आलेल्या गोल्ड व्हॅल्युएशन सेंटरचा शुभारंभ तसेच चौंडेश्वरी चौक शाखेच्या नूतनीकरणाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. दोन्ही सुविधांचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन शेखर साळुंखे यांच्या हस्ते झाले.

गोल्ड व्हॅल्युएशन सेंटरमुळे ग्राहकांना सोन्याचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अचूक व पारदर्शक मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. तसेच चौंडेश्वरी चौक शाखेचे नूतनीकरण करण्यात आल्याने ग्राहकांना अधिक प्रशस्त, सुसज्ज व सुविधाजनक वातावरणात सेवा मिळणार आहे.

यावेळी शेखर साळुंखे यांनी ग्राहकांच्या गरजेनुसार आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि सेवांमध्ये सातत्याने सुधारणा करणे यावर संस्थेचा भर राहणार असल्याचे सांगितले. कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे यांनी दोन्ही ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या सुविधा व सेवांची माहिती दिली.

कार्यक्रमास व्हा. चेअरमन हणमंतराव सपकाळ, संचालक सतिश साळुंखे, सीताराम हारूगडे, गोपाळ तारळेकर, गणेश अदाटे, संचालिका सुरेखा जाधव यांच्यासह सभासद, ग्राहक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

फोटोओळ : विटा येथील शिवप्रताप मल्टीस्टेटच्या मुख्य शाखेत गोल्ड व्हॅल्युएशन सेंटरचे उद्घाटन करताना चेअरमन शेखर

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here