निवडणूक प्रक्रियेविषयी गैरसमज पसरविल्यास कायदेशीर कारवाई | सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
सांगली : सांगली लोकसभा मतदार संघात 7 मे 2024 रोजी मतदान घेण्यात आले. मतदानाची ही प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यात आली. निवडणूक प्रक्रियेबाबत कोणत्याही व्यक्तींनी कोणत्याही माध्यमातून गैरसमज अथवा दिशाभूल करणारा मजकूर प्रसारित केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. निवडणूक प्रक्रियेसंदर्भात दिशाभूल करणाऱ्या बातम्या, संदेश यावर कोणीही विश्वास ठेवू नये. निवडणूक प्रक्रियेबाबत कांही शंका अथवा गैरसमज असल्यास संबंधितांनी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे शहानिशा करुन याबाबत खात्री करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
![Rate Card](http://sankettimes.com/wp-content/uploads/2022/03/WhatsApp-Image-2022-03-24-at-2.40.33-PM.jpeg)