30 ग्रामपंचायतीच्या संरपच पदाचे आरक्षण निवडणूकीनंतर | इच्छूकांची निराशा

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात होऊ घातलेल्या 30 ग्रामपंचायतीच्या संरपच पदाचे आरक्षण 15 जानेवारीच्या निवडणूकीनंतर काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.

जत तालुक्यात राज्यात घोषित झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमानुसार 30 ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे.

त्यात या गावातील संरपच पदाचे आरक्षण अद्याप जाहीर झालेले नाही. निवडणूक आयोगाच्या नव्या आदेशा नुसार एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या घोषित निवडणूक कार्यक्रमाच्या मतदानानंतर म्हणजे 15 जानेवारीनंतर आरक्षण सोडत होणार आहे.


Rate Card
परिणामी जत तालुक्यात पुन्हा संरपच पदासाठी इच्छूकांची निराशा झाली असून निवडणूकीनंतर होणाऱ्या आरक्षण सोडतीमुळे गोधळाची परिस्थिती निर्माण होणार आहे. निवडणूकीत विजयी पँनेलकडे चुकून आरक्षण पडलेला उमेदवार नसल्यास पुन्हा राजकारणाची खिचडी होणार निश्चित आहे. नेमके आरक्षण कोणते पडणार हे निश्चित नसल्याने इच्छुक उमेदवारांना मनविण्याची वेळ पँनेल प्रमुखावर येणार आहे. त्यातच निवडणूकीचा खर्च,व नियोजनाचा गोधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.