जतेत रस्त्यावरून गटारी
जत,प्रतिनिधी : जत शहरातील अनेक प्रमुख मार्गावरून नगरपरिषदेच्या
दुर्लक्षामुळे गटारी वाहत आहेत.त्यामुळे वाहनधारक,ऩागरिकासह,रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहेत.या पाण्यामुळे दिवसभर दुचाकी घसरण्याचे सत्र सुरू आहेत.त्यात अनेकजण जखमी झाले आहेत.
जत शहरातील अनेक रस्ते वर्षभरापासून खड्ड्यात गेले आहेत.
त्यातच लगतच्या गटारी कचऱ्याने तुंडूब भरल्या आहेत.पाणी सुटल्याच्या दिवशी गटरीत अतिरिक्त पाणी जमा होते,त्यातून वाहनारे सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे.त्यामुळे शहरातील गटारीच रस्त्यावरून वाहत असल्याने खड्ड्याची डबकी बनली आहेत.