सॅलरीतर्फे मुख्य अभियंता राजेश पाटील यांचा पदोन्नतीबद्दल सत्कार संपन्न

0
Rate Cardसांगली : दि संगली पॅलरी अर्म को.ऑप. सोसायटी लि, सांगली या संस्थेतर्फ सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असणारे श्रीयुत राजेश पाटील‌ यांची मुख्य अभियंतापदी पदोन्नती झालेबद्दल संस्थेचे चेअरमन अभिमन्यु मासाळ यांचे हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून मिरज शाखेमध्ये सत्कार करण्यात आला.स्वागत व प्रास्ताविक चेअरमन मासाळ यांनी केले.संस्थेचचे कामकाज व राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमांची माहिती करून दिली.सॅलरी संस्थेस 108 वर्षाचा इतिहास असलेली संस्था आहे.संस्था आपल्या भक्कम पायावर उभी राहून दैदिप्यमान प्रवास करीत आहे. 9,500 सभासदांच्या सेवेस अव्याहतपणे काम करत असून सभासदांच्या अडचणी सोडवत अनेक सामाजोपयोगी उपक्रमात हिरीरीने भाग घेत आहे.सहकार क्षेत्रात सँलरीने महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण केला आहे.यावेळी संस्थेचे संचालक लालासाहेब मोरे,शरद पाटील,राजेंद्र कांबळे,मलगोंडा कोरे सभासद,कर्मचारी उपस्थित होते.सुहास सुर्यवंशी यांनी आभार मानले.सांगली : सॅलरीतर्फ मुख्य अभियंता राजेश पाटील यांचा पदोन्नतीबद्दल सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.