जत बाजारपेठेत चोरट्यांचा सुळसुळाट

0जत,प्रतिनिधी : दिवाळी सणाच्या‌ पार्श्वभूमीवर जत शहरात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या मोबाईल,पैसे,किंमती वस्तूवर चोरट्यांनी डल्ला मारला.दिवाळी दोन दिवसावर आल्याने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.शहरात विविध भागातून जवळपास दहा नागरिकांचे मोबाईल,पाकिटे,किंमती वस्तू चोरीला गेल्याचे वृत्त आहे.हातावरचे पोट असणाऱ्या नागरिकांचे पगाराचे दिवस असल्याने अनेक मजूर नागरीक खरेदीसाठी मोठया प्रमाणात बाजारात गर्दी केली होती.काही नागरीकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.बिळूर येथील एक शेतमजूर महिला पगार झाल्याने दिवाळीचा बाजार खरेदी करण्यासाठी 2 हजार रुपये घेऊन जतेत आलेली होती.


अज्ञात चोरट्यांनी त्या महिलेची पर्स लंपास केली.त्या महिलेने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली.साहेब मी माझ्या घरी दिवाळीचा सण कसा साजरी करू असे म्हणत हुंदका डोळ्यात आश्रू आणत परिस्थिती कथन केली.


Rate Card


 तक्रार दाखल करत दोन संशयित महिलांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चोरट्यांनी चालविलेला चोऱ्यांच्या प्रकारांने भितीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान गुरूवारीही काही नागरिकांची मोबाईल,पैसे चोरी झाल्याची समोर आले आहे.Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.