आंसगीतुर्क येथे विविध विकासकामांचा प्रारंभ

0

जत,प्रतिनिधी : भाजपचे युवा नेते, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांच्याहस्ते तालुक्यातील आसंगी तुर्क येथे विविध विकास कामांचा प्रारंभ करण्यात आला.आसंगी तुर्क येथे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळेतील दोन खोल्याचे बांधकाम करण्यात येणार आहे.तसेच दलित वस्ती येथे विविध विकासकामे करण्यात येणार आहेत.

यावेळी आसंगी तुर्कचे सरपंचशिंगाडे,उपसरपंच, सिद्धू बसर्गी, तानाजी वाघे, केंद्र प्रमुख राठोड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना सरदार पाटील म्हणाले, जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली दरीबडची मतदारसंघात आजपर्यत विविध विकासकामे करण्यात आली आहेत. दरीबडची जिल्हा जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात विकासकामे करण्यावर आपण भर दिला आहे.


Rate Card


खासदार निधी,आमदार निधी. जिल्हा परिषद अंतर्गत येणारा निधी, जिल्हा नियोजन समितीतून येणारा निधी मोठ्या प्रमाणात दरीबडची गटात खेचून आणला आहे. येणाऱ्या काळात ही गटात विविध विकासकामे करण्यात येणार आहेत.आसंगी तुर्कचे सरपंच शिंगाडे यांनी सरदार पाटील यांनी गावासाठी निधी मंजूर करून आणून काम सुरू केल्याबद्दल सरदार पाटील यांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.