आसंगी येथे हनुमान मंदिर देवस्थान जागेत अतिक्रमण
माडग्याळ,वार्ताहर : आसंगी (ता.जत)येथील देवस्थान जमिनीवर विनापरवाना अतिक्रमण केल्याची तक्रार देवस्थानचे पुजारी यशवंत माने यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
पुजारी श्री.माने यांनी निवेदनात असे म्हटले आहे की,आसंगी येथे वंश परंपरागत मारुती देवस्थानची पूजा करून देवस्थानची जमीन देखभाल करून कसून खात आहे.ग्रामपंचायतचे पदाधिकाऱ्यांनी गावठाण लगत विनापरवाना अतिक्रमण केले आहे.मनाई केले असता जबरदस्तीने दमदाटी करून बांधकाम चालू ठेवले आहे.

स्वच्छास,बाथरूम, गटारी सांडपाणीचे जबरदस्तीने बांधकाम चालू असून होणारे अतिक्रमण सरपंच,पदाधिकारी यांचा मनमानी कारभार थांबवण्यात यावा व त्यांच्यावर सखोल चौकशी करून कारवाई अशी मागणी माने यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.