विशेष | 2 हजार‌ पेक्षा जास्त‌ कोरोनाचे स्वाब घेणारा अवलीया ; डॉ.अभिजीत चोथे

0

डफळापूर,प्रतिनिधी : कोरोनाच्या सुरूवातीपासून आतापर्यत सुमारे दोन हाजार स्वाब घेणारा अवलीया डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजीत चोथे यांच्या रूपाने लाभला आहे.जगभरात कोरोना विषाणूच्या साथीने थैमान घातले आहे.भारतातही मार्च अखेरपासून या साथीने प्रवेश केला. या साथीपुढे जगातील बलशाली सत्ता देखील हतबल झाल्या होत्या. अगदी सूक्ष्म स्वरूपातील या विषाणूने परिस्थिती चिंताजनक केली होती.या साथीच्या वाढत्या प्रसारामुळे जगभरातील मानवी समूहाला ‘जिवंत राहणे’ हीच आपली प्राथमिकता होते हे अधोरेखित करायला भाग पाडले होते.साथीच्या प्रकारातील या विषाणूचा प्रादूर्भाव जगभरातील अनेक श्रीमंतापासून ते गरीबापर्यंत होतोय. जोपर्यंत या विषाणूचे स्वरूप, त्याचा प्रसार आणि व्याप्ती याचा ताळेबंद घालायच्या या विषाणूने व्यस्त प्रमाणात पसरायला सुरुवात केलेली होती.अशा काळात‌ संपुर्ण जगाला भारताची काळजी होती.पंरतू‌ सर्वाचे अंदाज पोल ठरवत भारतात ही साथ थोपविण्यात यश मिळविले आहे.ते‌ भारतातील डॉ.अभिजीत चोथे सारख्या कोरोना योध्दामुळेच.मार्च मध्ये भारतात प्रवेश केल्यानंतर कोरोना बाबत मोठी भिती होती.पहिल्या टप्यात अनेक डॉक्टरांनी भितीने कोरोनाच्या प्रशिक्षणासाठी नकार दिला होता.अशा स्थितीत घरामध्ये लहान बाळ होते.तरीही,धोका पत्करून युवा,अनुभवी डॉ.अभिजीत चोथे यांनी कोरोना स्वाब घेणे,कोरोना ग्रस्तावर उपचार यांचे प्रशिक्षण पुर्ण केले.कोरोनाच्या पहिल्या टप्यात संपुर्ण जत तालुक्यातील कोविड सेंटरची जबाबदारी डॉ.चोथे यांच्यावर आली.मोठी भिती,धोका असतानाही त्यांनी हाजारो संशयिय कोरोना ग्रस्ताचे स्वाब घेत त्यांना उपचारासाठी मार्गदर्शन केले.


डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून लोकासाठी आरोग्यासाठी झोकून देण्याची प्रथमपासून ख्याती असलेली डॉ.अभिजीत चोथे‌ यांनी कोरोना काळात प्रभावी कामगिरी केली आहे.त्यामुळे त्यांना मिरज कोविड सेंटरचाही काही काळ पदभार देण्यात आला होता.तालुक्याची जबाबदारी व्यवस्थित हाताळत त्यांनी कोरोना रुग्ण वाढू नयेत यासाठी मोठा वाटा उचलला.शिवाय तालुक्यातील अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

Rate Card


कोरोनाचा मोठा प्रभाव असताना डॉ.अभिजीत चोथे कोरोना योध्दाप्रमाणे तालुक्यात स्वाब घेण्याचे काम करत होते.सध्या डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील शेकडो संशयिताचे स्वाब घेत त्यांनी आपल्या केंद्रातील कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांच्या साथीने कोरोनाचा प्रभाव नियत्रणांत आला आहे.धोका पत्करून डॉ.चोथे यांचे कार्य कोरोना इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहले जाणार ऐवढे निश्चित आहेत.डफळापूर येथे थेट‌ बाजार पेठत पीपीई किट घालून शेकडो स्वाब घेत आपली उपलब्धता सिध्द केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.