शहराच्या धर्तीवर जतेत तांराकित एमआयडीसीला अनुकूल वातावरण मोठ्या उद्योगासाठी,जमिन,पाणी, विज व राज्यमहामार्गाची उपलब्धता ; राजकीय, जनरेटा गरजेचा

0

जत,प्रतिनिधी:जत तालुक्यातील भोंडा माळावर रोजगार निर्मितीसाठी एमआयडीसी महत्वपुर्ण आहे. इस्लामपूर, अलकूड-मणेराजूरीतील भुसंपादनाच्या अडचणीमुळे तेथील एमआयडीसी रद्द झाल्याने जतचा प्रमुख्याने विचार होणे गरजेचे आहे. जत तालुक्यातील दक्षिण,उत्तर अथवा पुर्व-पश्चिम कुठेही मुबलक जमिन उपलब्धं आहे.त्यासाठी भुसंपादनासाठी शेतकरी पुढाकार घेऊ शकतात. त्या पाश्वभूमिवर जतच्या एमआयडीसी साठी जनरेट्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. 

सांगली जिल्ह्यातील वाघवाडी पेठ इस्लामपूर एमआयडीसी रद्द झाली. नंतर स्व.आर.आर.पाटील यांनी 1997 साली अलकूड-मणेराजूरी या एमआयडीसीचा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता. त्यासाठी गेल्या पंधरवड्यात एमआयडीसीच्या अधिकार्यांनी बैठक घेऊन भू-संपादनासाठी सुरुवात केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी विरोध केला. पून्हा मणेराजूरी-योगेवाडी या मिनी एमआयडीसीचा प्रस्ताव नव्याने समोर आला आहे.मात्र जत तालुक्याच्या  पश्चिम-उत्तर भागात सुमारे एक हजार पाचशे एकर जमीन एमआयडीसी साठी उपलब्ध आहे. याचा विचार करण्याची मागणी होत आहे.

सध्या जतमधील एमआयडीसीची जागा केवळ पंधरा एकर क्षेत्रावर आहे. उत्तर-पश्चिम भागातील गुळवंची, वाळेखिंडी, बेवनूर, कोसारी, प्रतापूर, जांभूळवाडी या गावांच्या मध्यभागी एकूण सुमारे एक हजार पाचशे एकर जमीन उपलब्ध आहे. यामध्ये प्रामुख्याने शासकीय मालकीची 500 एकर जमीन तर शेतकऱ्यांच्या मालकीच्या एक हजार एकर पडीक जमिनी उपलब्ध आहेत.

          सोलापूर व सांगली जिल्ह्याच्या सीमेवर, कर्नाटक राज्यातील विजापूर, अथणी, बेळगाव या शहरापासून या प्रस्तावित एमआयडीसीची जमीन उपलब्ध होऊ शकते.तसेच या भागातून रत्नागिरी-नागपूर, कराड-विजापूर, कोल्हापूर-सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग जातात. तर कोल्हापूर-लातूर हा रेल्वे मार्ग उपयुक्त आहे. तसेच उद्योगासाठी आवश्यक पाण्यासाठी गुळवंची, प्रतापूर, दूधेभावी हे मोठे सिंचन तलाव असून यामध्ये म्हैसाळ,टेंभू योजनेचे पाणी मिळू शकते. शिवाय वाळेखिंडी, प्रतापूर या ठिकाणी वीज पुरवठा करणारी उपकेंद्र आहेत. शिवाय सोलर वीज निर्मिती साठी वाळेखिंडी येथील 450 एकर जमिनीचा शासनाकडे प्रस्ताव दिला आहे.

Rate Card

 जत,आटपाडी, सांगोला, कवठेमहांकाळ या माणदेशी दुष्काळी तालक्यासाठी ही एमआयडीसी वरदान ठरू शकते. या भागात मोठ्या प्रमाणात डाळिंब, द्राक्षे, या मुख्य फळबागाबरोबरच ज्वारी, बाजरी, मका,कापूस ही पीके घेतली जातात. या फळपिकावर प्रक्रीया उद्योग उभे राहू शकतात. त्यामुळे या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य दर मिळेल.त्याचबरोबर या भागात मजूरांची संख्या मोठी आहे. सुशिक्षित बेरोजगार युवक आहेत. त्यामुळे कुशल-अकुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे.  शेकडो युवकांना रोजगार निर्मिती उपलब्धं होईल. शहराकडे जाणारे तरूणांचे लोंढे थांबले जातील .शिवाय कर्नाटक राज्यातील बेळगाव, अथणी, विजापूर, हुबळी या बाजारपेठा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सांगोला, कवठेमहांकाळ, आटपाडी, जत या चार तालुक्याच्या मध्यभागी येणाऱ्या या एमआयडीसीच्या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची मागणी नागरीकातून होत आहे.

चौकट

फडणवीस सरकारच्या उद्योगांना अनुकूल सरकार असल्याने जत तालुक्यात एकादा मोठा उद्योग आल्यास जतसह सांगोला,कवटेमहांकाळ तालुक्याच्या कायापालट घडू शकतो. जत तालुक्यात मोठे क्षेत्र, बेरोजगार उपलब्धं आहेत.म्हैशाळ सिंचन योजनेचे बारामाही पाणी होऊ शकते. पवन ऊर्जा कंपीनीचे मोठे पोजेक्ट असल्याने विजही मुबलक आहे. भुसंपादनासाठी अडचणी येणार नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळे शहराच्या धर्तीवर मोठी एआयडीसी झाल्यास शासनाचे धोरण फलदायी ठरू शकते. त्यासाठी राजकीय,व जनतेचा रेटा आक्रमक करणे गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.