डफळापूरचे मन्सूर खतीब यांचा थक्क करणारा प्रवास 1980 च्या आसपास क्रांती दुध डेअरीमधून सहकारातून समाजकारण करत डफळापूरचा अल्पसंख्यक समाजातील तरुण मन्सूर खतीब यांनी ओळख निर्माण केली.
प्रथम 1983 ला डफळापूर सोसायटीत संचालकपदी निवडून येत राजकीय आयुष्य सुरू केली.डफळापूर ग्रामपंचायतीचे सदस्य,सांगली बाजार समितीचे संचालक,जत पंचायत समितीचे उपसभापती,सभापती ते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अशी किमया एका सामान्य कुंटुबातून आलेले खतीब यांनी साध्य केली आहे. कोणत्याही क्षेत्रात फक्त सातत्य व आपल्या कामाशी असणारा प्रामाणिक पणा आपल्याला यशस्वी करणारचं हे खतीब यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीनंतर स्पष्ट झाले आहे.
डफळापूर या गावात मन्सूर खतीब व तत्कालीन कॉग्रेसचे नेते स्व.सुनिलबापू चव्हाण या दोघा वर्ग मित्रानी राजकारणाची सुरूवात केली.गेल्या चार दशकात मन्सूर खतीब यांचे राजकारण आकारास आले.डफळापूर सोसायटीचे संचालक या पदापासून त्यांचा राजकारणात प्रवेश झाला.
सुस्वभावी, स्नेह आणि शब्द जपणाऱ्या,
अगदी मनमिळावू,राजकारणातील बारकाव्याचे आकलन,माणसाचा मोठा गोतावळा,प्रत्येकाचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव उपलब्ध असणारा नेता अशी मन्सूर चाचाची ओळख..
बाजार समिती निवडणूकीत त्यांनी कॉग्रेसपासून फारकत घेतली.गत जिल्हा परिषद निवडणूकीत डफळापूर मतदार संघातून ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीत उतरले होते.मतदाराच्या मोठ्या प्रतिसादानंतरही त्यांना पराभव स्विकारावा लागला.
त्यावेळी मन्सूरचाचाचे राजकारण संपले असे कयास लावले मात्र पराभवातून सावरत त्यांनी डफळापूर ग्रामपंचायत निवडणूकीत पक्ष विरहित पँनेल तयार करत थेट संरपच,उपसंरपच पदासह सत्ता आणली.
जिल्हा परिषदेतील पराभवानंतरही त्यांनी राजकारण सोडले नाही.लोकांच्या साध्या,साध्या समस्या सोडविण्यात ते कायम संपर्कात असायचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी मन्सूर चाचा यांच्यातील हे गुण हेरून त्यांना राष्ट्रवादीत आणले.त्यापुढे जात त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इतर मागास प्रवर्गातून त्यांना उमेदवारी दिली.चाच्यांनी दिलेला विश्वास सार्थ ठरवत विजयी पताका लावली आहे.
एक दुध संकलन केंद्राचा मालक ते जिल्हा बँकेचा संचालक होण्यापर्यतचा प्रवास थक्क करणारा तर आहेचं मात्र राजकारणात संयम,जमिनीवर पाय असणे किती गरजेचे आहे हे मन्सूर खतीब यांनी दाखवून दिले आहे.
शंब्दाकन ;
राजू माळी
संपादक संकेत टाइम्स
खतीब यांनी भूषविलेली पदे
- संचालक- सर्व सेवा शेती सोयायटी डफळापुर-1983-1987
- ग्रामपंचायत सदस्य डफळापुर -1994-1999
- संचालक-कृषी उत्पन्न बाजार समिती,सांगली 1996-2001
- उपसभापती-जत पंचायत समिती जत 2007-2009
- सभापती-जत पंचायत समिती जत 2009-2012