जत : जत नगरपरिषदेतील भाजपचे नगरसेवक
मिथुन भिसे यांनी स्वीकृत नगरसेवकपदाचा सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे राजीनामा दिला.
जत नगरपरिषदेत भाजपला एक स्वीकृत
नगरसेवकपद आहे. पहिल्या टप्प्यात भाजपने माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत यांना संधी दिली होती. मागील वर्षी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या आदेशानुसार उमेश सावंत यांनी स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी मिथुन भिसे यांना संधी दिली.यावर्षाअखेर नगरपरिषदेची निवडणूक होणार आहे.
आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने मिथुन भिसे यांचा राजीनामा घेत शेवटच्या टप्यात नव्या चेहऱ्याला संधी देण्याची रणनीती आखली आहे. त्यानुसार विलासराव जगताप यांचा आदेश येताच मिथुन भिसे यांनी राजीनामा दिला.
गौतम ऐवळेचे नाव आघाडीवर मिथुन भिसे यांच्या राजीनाम्यानंतर जत येथील युवक नेते, खोकीधारक संघटनेचे अध्यक्ष गौतम ऐवळे यांचे नाव स्वीकृत नगरसेवकपदासाठी आघाडीवर आहे.माजी आमदार जगताप यांनी त्यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.