जिल्हा बँकेने नवी प्रणाली बंद करावी ; महेश खराडे

0
9
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेने आधुनिकीकरणाची कास धरण्याचा आव आणत पीक पाहणी साठी सटेलाईट जीपी एस सिस्टीम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.याला शेतकऱ्यांतून तीव्र विरोध होत आहे ही नवी प्रणाली बंद करावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.

 

ही पद्धत बँकेने शेतकऱ्याच्या हितासाठी आणली नसून स्कायमेट कंपनीकडून कमिशन खाण्यासाठी सुरू केले आहे. असा आरोप करून खराडे म्हणाले, कर्जवसुली मोहीम ही केवळ शेतकऱ्यांना त्रास देवून सुरू आहे.हिम्मत असेल तर बड्या 100 धेंडाची 1000 कोटीची वसुली करून दाखवा राजकारणी मंडलीपुढे बँकेचे अधिकारी शेळी होवून जातात त्यामुळेच बड्या धेंडची वसुली अद्याप झालेली नाही.

 

साखर कारखाने, सूतगिरण्या, ऑईल मिल, सोयाबीन प्रकल्प, गारमेंट आदींची कर्जे ही जिल्ह्यातील बड्या नेत्याची आहेत. बहुतांश कर्जे ही थकीत आहेत ते वसूल करण्याचे धाडस बँकेने दाखवावे असे आवाहन त्यांनी केले.

 

नव्या सेतू अप विषयी बोलताना खराडे म्हणाले, बागायती द्राक्ष डाळिंब उस हळद सह अन्य पिकांना बँक पीक कर्ज आणि मध्यम मुदतीचे कर्ज देते सदर कर्ज देण्यासाठी बँक इन्स्पेक्टर पीक पाहणी करून जायचे त्यानंतर शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जायचा मात्र आता सेतू अप च्या माध्यमातून ई पीक पाहणी केली जाणार आहे.त्यासाठी शेतकऱ्यांना प्रति अकर 130 रुपये मोजावे लागणार आहेत शिवाय ही वेळखाऊ प्रणाली आहे. त्यासाठी प्रचंड वेळ लागतो आहे.
कंपनीचे अधिकारी येणार ते प्रत्यक्षात शेतात जाणार तेथून पीक पाहणी करणार त्या साठी वेळ जादा लागत असल्याने कर्ज मिळण्यास ही दिरंगाई होत आहे.  त्यामुळेच या नव्या पद्धतीला शेतकऱ्यांच्या तून ही विरोध होत आहे,म्हणूनच नवी प्रणाली बंद करावी, अन्यथा नाईलाजाने बँकेवर मोर्चा काढू असा इशारा खराडे यांनी दिला आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here