गलाई व्यवसायिकाचा खून | खानापूर तालुक्यातील माधळमुठी येथील घटना
विटा : खानापूर तालुक्यातील माधळमुठी
येथील गलाई व्यवसायिकाचा आर्थिक व्यवहारातून निघृण खून झाल्याची घटना घडली आहे.शनिवारी रात्री हा प्रकार घडला. महादेव रघुनाथ माळी (वय 29) असे खून झालेल्या गलाई व्यवसायिकाचे नाव आहे.या खूनप्रकरणी दुसरा गलाई व्यवसायिक राहूल किसन माळी याला (ता.खानापूर)याला विटा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.व्यावसायिक भागीदारीतून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
