जत | आर्थिक तडजोडीने वादग्रस्त मनरेगाची बिले देऊन गैरव्यवहार : विक्रम सावंत |

0

 यांचे आ.जगताप,प्रशासनावर गंभीर आरोप

जत प्रतिनिधी : राज्यभर गाजलेला जत तालुक्यातील मनरेगा भ्रष्टाचारातील कामाची बिले काढण्यात येत आहेत.यात  आमदार विलासराव जगताप व त्यांच्या बगलबच्चाकडून भष्ट्राचार केला असतानाही आर्थिक लाभापोटी व आ.जगताप यांच्या दबावातून ही बोगस बिले देण्यात येत आहेत,असा आरोप कॉग्रेस नेते विक्रमसिंह सांवत यांनी केला.

सांवत पुढे म्हणाले,मनरेगाच्या भ्रष्ठाचारामुळे जत पंचायत समिती बदनाम झाली आहे. मनरेगा घोटाळ्यामुळे राज्यभर नाचक्की झाली असतानाही आता अधिकाऱ्यांवर  आमदार विलासराव जगताप व त्यांचे बगलबच्चाकडून बिले काढण्यासाठी अधिकाऱ्यावर दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. काही दिवसा पूर्वी दीड कोटीची बिले काढण्यासाठी एका सदस्याच्या पतीने मोठी आर्थिक तडजोड करून बिले काढली आहेत.बिल काढल्याचा थांगपत्ता सभापती सह सदस्यांनाही लागू दिला नाही.मनेरेगाच्या भ्रष्ठाचाऱ्याच्या आम्ही वारंवार तक्रार केली आहेत.पूर्ण चौकशी केल्याशिवाय बिले देऊ नयेत अशी लेखी तक्रारीही दिल़्या आहेत.

सावंत पुढे म्हणाले,सोनालगी,संख तिकोंडी,बोर्गी,माडग्याळ या सर्व गावा मध्ये चुकीच्या पद्धतीने कामे झाली आहेत.25 सप्टेंबर 2018 रोजी सहायक संचालक महाराष्ट्र शासन यांच्या कडून आयुक्त यांना जे पत्र आले ते अर्धवट माहितीच्या आधारे असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते.त्याच आशयाचे पत्र आयुक्त कार्यालयाकडून कनिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आले, ज्याचा आधार प्रलंबित देयके देण्यासाठी घेण्यात आला.

19 नोहेंबर 2018 रोजी जत प.स.च्या बिडिओ यांच्याकडून वरिष्ठ कार्यालयास देण्यात आलेली माहिती व ग्रामविकास अधिकारी /ग्रामसेवक यांना 3 सप्टेंबर 2018 रोजी देण्यात आलेली माहिती या मध्ये स्थळ पाहणी /फेर मुल्यांकन बाबत जि माहिती देण्यात आली त्यामध्ये तफावत आढळून येते.यात बिडिओ यांनी वरिष्ठ कार्यालयाची दिशा भूल करणारी माहिती दिल्याचे स्पष्ट होते.

सांवत म्हणाले,26 मार्च 2019 रोजीच्या पत्रानुसार वरिष्ठ कार्यालयाकडून झालेल्या कामांच्या नोंदीतील त्रुटी बाबत मार्गदर्शन मागवण्यात आले होते.त्याबाबत कोणतीही स्पष्टता मिळत नाही.

Rate Card

प्राप्त माहिती नुसार फक्त ठराविक कामांचे स्थळ पाहणी व फेर मुल्यांकन वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यात आले.यात ठराविक ठेकेदारांचा फायदा होईल असे फेर मुल्यांकन करण्यात आले.

झालेल्या कामांच्या अंदाज पत्रकामध्ये अनेक चुका झालेल्या होत्या तसेच तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे कोणतेही नोंदी नसताना त्याकडे अक्ष्यम दुर्लक्ष करण्यात आले आहे.हि गंभीर बाब आहे.तरीही बिले दिली आहेत.यातही 60:40 चे प्रमाण राखले गेले नाही त्या मुळे नरेगा कायद्याचे उल्लंघन करण्यात आले आहे.

प्राप्त माहिती नुसार प्रलंबित देयका मधील कामाच्या मोजमाप पुस्तिकामध्ये तत्कालीन गट विकास अधिकारी यांची स्वाक्षरी न घेता देयकांची तपासणी बाबत कोणतीही कार्यवाही न करता ऑनलाइन एफटीओची नोंद केले गेले आहे.तसेच जी कामे अभिसरन अंतर्गत घेण्यात आलेली आहे.त्याबाबत कोणतेही अभीलेख उपलब्ध नसताना देयके देण्यात आली आहेत.

सांवत म्हणाले,बिडिओ स्व:ता कोणतीही स्थळ पाहणी किंवा कामाचा दर्जा न तपासता देयके वर्ग केले आहेत.एका ठेकेदारांनी केलेल्या कामांची प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी ही एकाच दिवशी मिळाल्याचे स्पष्ट होत असून संगनमताने कामे मंजूर करून घेतल्याचे आढळून येत आहे.ठेकेदारांना निधी अदा करताना वित्तीय आधीनियमाचे पालन केले गेले नाही.तसेच नरेगा कायद्यातील तरतुदींचेहि पालन केले गेले नाही.

बिडिओ जत यांच्या पत्र व्यवहारानुसार सदर कामांच्या नोंदीमध्ये व कार्यवाहीमध्ये अनेक गंभीर त्रुटी असताना देखील देयके देण्यात आली आहेत.वरिष्ठ कार्यालयाकडून मोघम व कोणत्याही स्पष्टते शिवाय आदेश देण्यात आले आहे.ही अतिशय गंभीर बाब आहे.

सदर कामांचे प्रशासकीय मंजुरी देणारे तात्कालीन अधिकारी गैर व्यवहारामुळे निलंबित असताना त्याच कामांचे देयके देताना त्याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहेत.शासनाच्या निधीचा पुन्हा गैरवापर झाला असून यांची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी सांवत यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.