‘शेतकऱ्यांचा पैसा शेतकऱ्यांच्या विकासकामी’ | महावितरणकडून पायाभूत सुविधांसाठी 236 कोटींची कामे | सांगलीत 20 नवीन उपकेंद्रे

0

दोन वर्षात 33 हजार कृषिपंपांना दिली वीजजोडणी

महावितरणने कृषी धोरण 2020 अंतर्गत शेतकऱ्यांनी थकबाकी पोटी भरलेल्या रक्कमेतून कृषी आकस्मिक निधी तयार केला आहे. या निधीत कोल्हापूर, सांगलीत जिल्हास्तरावर 236 कोटी रूपये उपलब्ध आहेत. या निधीतील शेतकऱ्यांचा पैसा शेतकऱ्यांच्या विकासकामी खर्च करण्यात येतो आहे. त्यातून 29 नवीन 33/11 केव्ही विद्युत उपकेंद्रे, 18 उपकेंद्रांची क्षमता वाढ, 327 नवीन वितरण रोहित्रे उभारणी इ. कृषिक्षेत्राच्या पायाभूत विद्युत सुविधा बळकटीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. गत दोन वर्षात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात 33 हजार कृषिपंपांना वीजजोडणी देण्यात आली आहे, अशी माहिती कोल्हापूर परिमंडळाचे  मुख्य अभियंता मा.श्री.परेश भागवत यांनी दिली आहे.

 

          द्राक्ष व्यापाऱ्याकडील १ कोटी ९ लाख लुटले,पोलीसांनी ८ तासात चोरट्यांना पकडले सविस्तर बातमी वाचा एका क्लिकवर               

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृषिक्षेत्राच्या सिंचनासाठी एका वर्षात तब्बल 29 नवीन उपकेंद्रे उभारणी करणे ही महावितरणची एक भरीव कामगिरी असणार आहे. कृषिक्षेत्राचा वाढता वीजभार लक्षात घेऊन कोल्हापूरात जिल्हास्तरीय 47 कोटी  कृषी आकस्मिक निधीतून 9 नवीन 33/11 के.व्ही. उपकेंद्रे व 12 उपकेंद्रांची क्षमता वृध्दीची कामे प्रस्तावित आहेत.

कसलं आणलायं सोशल मिडिया | शेतकऱ्यांच्या पोराचा भन्नाट ‘व्हि’डि’ओ’ पहाचं एकदा

सांगलीत जिल्हास्तरीय  116 कोटी 97 लक्ष कृषी आकस्मिक निधीतून 20 नवीन 33/11 के.व्ही. उपकेंद्रे व 6 उपकेंद्रांची क्षमता वृध्दीची कामे प्रस्तावित आहेत. भिकवडी बु. (ता.खानापूर), घरनिकी (ता.आटपाडी), कुंडल 2×10 एमव्हीए क्षमतेचे (ता.पलूस), शेटफळे (ता.आटपाडी), आरवडे-चिंचणी (ता.तासगाव), अंकले (ता.जत), कोकळे (ता. कवठेमहांकाळ) या नवीन उपकेंद्रांची कामे प्रगती पथावर आहेत. टाकवे (ता.शिराळा), बिरनाळ (ता.जत), वाझर (ता.खानापुर), दिघंची (ता.आटपाडी), हिवतड (ता.आटपाडी),  चिखली (ता.शिराळा), हिंगणगाव (ता. कवठेमहांकाळ) या नवीन उपकेंद्रांच्या उभारणीसाठी आणि लिंगवरे (ता. आटपाडी),  शिवणी (ता.कडेगाव), शिरसगाव (ता.कडेगाव) या उपकेंद्रांच्या 5 एमव्हीए क्षमता वृध्दीसाठी निविदा प्रक्रिया सुरु आहे. निंबवडे (ता.आटपाडी), निंबळक (ता.तासगाव), काळमवाडी (ता.वाळवा), खंडाळ (ता.जत), साळमळगेवाडी (ता.जत), साळशिंगे (ता.खानापूर), या नवीन उपकेंद्रांच्या उभारणीसाठी व तिकोंडी (ता.जत), दरीकोन्नुर (ता.जत), शेगाव (ता.जत) या उपकेंद्रांच्या 5 एमव्हीए क्षमता वाढीसाठी प्रस्ताव मंजूरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

   म्हैसाळ योजनेचे पाणी जत पूर्व भागात खळखळू लागले वाचा एका क्लिक वर

कोल्हापूर जिल्ह्यात 200 नवीन 100 केव्हीए क्षमतेच्या नवीन वितरण रोहित्रांची कामे प्रस्तावित आहेत. सांगली जिल्ह्यात 7 कोटी 12 लक्ष निधीतून 127 नवीन वितरण रोहित्र उभारणीची कामे सुरु आहेत. कवठेमहांकाळ विभागातील शेतीच्या सिंचन क्षेत्रातील वाढ लक्षात घेऊन त्या भागातील विद्युत जाळे मजबुती करणासाठी जत उपविभागात 63 तर संख उपविभागात 55 व इस्लामपुर विभागात 9 नवीन वितरण रोहित्रे उभारली जात आहेत. इस्लामपुर विभागात 11 के.व्ही. वाटेगाव फिडरचे विलगीकरणासाठी 27 लक्ष 45 हजार निधीतून उच्चदाब वाहिनी उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. सांगली ग्रामीण विभागात 33 के.व्ही. दुधगाव व कवठेमहांकाळ 33 केव्ही. घाटनांद्रे फीडरचे काम प्रस्तावित आहे. शेतीपंपांना योग्य दाबाचा पुरवठा व्हावा, यासाठी सांगली ग्रामीण 15, इस्लामपूर 9 तर कवठेमहांकाळ विभागात 13 कॅपॅसिटर बँक बसविण्यात येणार आहेत. महावितरणकडून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात सन 2022-23 मध्ये अनुक्रमे 6752 व 11525 तर सन 2021-22 मध्ये अनुक्रमे 5904 व 8861 अशा एकूण 33 हजार 42 कृषिपंपांना युध्दपातळीवर वीजजोडण्या देण्याचे काम करण्यात आले आहे.

Rate Card

         घरबसल्या ऑनलाईन पैसे कमावायचे आहेत | दरदिवशी 1000 ते 2000 पेक्षा जास्त पैसे कमवू शकता | सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करून पहा*

कृषि आकस्मिक निधीतून प्रगतीपथावरील व प्रस्तावित  पायाभूत सुविधांच्या उभारणीमुळे कोल्हापूर, सांगलीतील विद्युत जाळे विस्तारणार आहे. अखंडित व दर्जेदार वीजपुरवठ्यासह विद्युत सुविधांपासून वंचित, दुर्लक्षित शेतकरी वर्गास सिंचनासाठी वीजेची उपलब्धता झाल्याने कृषी क्षेत्राच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे.

         सांगलीतील राजा-राणीची जोडी | समाजाला आदर्श घालून देणारा व्हिडिओ पहाचं…                                                              

सांगली जिल्हा-

तालुका नवीन उपकेंद्र उपकेंद्र क्षमता वाढ
जत 4 3
आटपाडी 5 1
खानापूर 3
तासगाव 2
कडेगाव 2
शिराळा 2
कवठेमहांकाळ 2
पलूस 1
वाळवा 1

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.