नको टीव्ही, मोबाइलचा नाद,घडवू घराघरांत संवाद, उपक्रमाला आले चळवळीचे स्वरूप
मोबाइल, टिव्ही, मुळे हरवत चाललेला कुंटुबातील आबोला संपत चालला आहे.
यांचे गंभीर परिणाम भविष्यात लागणार आहेत.पुढचे विसंवादाचा दुष्परिणाम व भयान वास्तव ओळखून गावगाड्यातील ओळखत कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप, वाठार, किणी, पेठवडगाव, नरंदे, खोची, तळसंदे या गावांनी सायंकाळी सात ते साडेआठ या कालावधीत मोबाइल आणि टीव्ही बंद करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.त्याला चळवळीचे स्वरूप प्राप्त होत आहे.
सांगलीतील राजा-राणीची जोडी | समाजाला आदर्श घालून देणारा व्हिडिओ पहाचं…
घरातील मुलगा, नातू मोबाइलवर, सून टीव्हीसमोर, मग मनातलं बोलायचं कुणासमोर अशी ज्येष्ठांची झालेली अवस्था, तर दुसरीकडे सतत मोबाइलमुळे अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष यामुळे कधी काळी नात्यांच्या गोतावळ्यात गजबजलेला गावगाडा अबोल झाला होता.टीव्ही पाहत किंवा मोबाइलवर बोलतच स्वयंपाकघरातील जेवण बनते, हा हल्लीचा अनुभव आहे. त्यामुळे जेवणही रूचकर बनत नसल्याच्या तक्रारी ज्येष्ठांकडून केल्या जातात. मात्र, टीव्ही बंदचा उपक्रम राबविलेल्या गावांमध्ये मात्र, आता आमच्या घरातील जेवणाला चव आली असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
ते ओळखून कोल्हापूरातील या गावांनीच आता बदल करण्यासाठी उचललेली मोहिमेला चळवळ बनलेली अन्य गावातून भविष्यात दिसेल.या गावांनी ठरावीक वेळेत टीव्ही, मोबाइल बंद करून गावगाड्याला पुन्हा संवादाची वाट खुली करून दिली आहे. त्यामुळे या गावांनी घेतलेला हा निर्णय नातू – आजोबा, सासू – सून, मुलगा – आई यांचा तुटलेला संवाद जोडणारा ठरत आहे. मोबाइल आणि टीव्ही बंदच्या निर्णयाने माणसात माणूस राहिला, अन जेवणालाही चव आली, अशाच भावना या गावांमधील नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
अंबपमध्ये हा उपक्रम २५ फेब्रुवारीपासून सुरू झाला.
सरपंच दीप्ती माने यांनी यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांच्या अभ्यास करण्याच्या वेळेत टीव्ही, मोबाइल बंद करण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्यांनी अनेक पालकांशी बोलून त्यांना विश्वासात घेतले. त्यामुळे हा उपक्रम अंबपमध्ये यशस्वी झाला आहे.टीव्ही, मोबाइल बंदमुळे माणूस माणसात राहिला आहे. गावात दीड तास ही उपकरणे बंद करण्याची वेळ दिली असली तरी आता चार – चार दिवस आम्ही टीव्ही सुरूही करत नाही,अशा प्रतिक्रिया अनेक गृहिणीनी केल्या आहेत.
हेही वाचा
• म्हैसाळ योजनेचे पाणी जत पूर्व भागात खळखळू लागले