अण्णा हजारेंना जीवे मारण्याची धमकी !

0
राज्यातील जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची हत्या करणार असल्याची धमकी देण्यात आल्याच्या वृत्ताने राज्यात खळबळ उडाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यामधील निपाणी वडगाव येथील संतोष गायधने या व्यक्तीने 1 मे रोजी आपण अण्णा हजारे यांची हत्या करणार असल्याचं म्हटलं आहे.
शेतीच्या वादामध्ये जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मध्यस्थी करून आपल्याला न्याय द्यावा यासाठी गायधने यांनी अण्णा हजारे यांना निवेदन दिलं होतं. तसेच प्रशासनालाही त्यांनी निवेदन दिलं होतं. मात्र, निवेदन देऊन देखील पदरी निराशा आली आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
Rate Card
शेतीच्या वादातून गटातील 96 जणांनी संतोष गायधने यांच्या परीवारावर दबाव आणला. खोट्या केस दाखल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने मागील अनेक दिवसांपासून माझं कुटुंब भीतीच्या सावटाखाली जगत आहे. शेतीच्या वादात आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. त्यामुळेच आम्ही अण्णांकडे गेलो होतो, अशी व्यथा संतोष गायधने यांनी मांडली आहे.
दरम्यान गायधने यांनी अण्णा हजारे यांच्याकडे मी मदतीची मागणी केली होती, परंतु अण्णांनी माझ्या निवेदनाची दखल घेतली नाही असा आरोप त्यांनी करत 1 मे रोजी राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णा हजारे यांची मी हत्या करणार असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान प्राप्त माहीतीनुसार, त्यांनी राष्ट्रपती महोदयांकडे इच्छामरणाची याचिका दाखल केली आहे. आम्हाला न्याय देणं शक्य नसेल तर आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी याचिका दाखल केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.