जतला न्यायालयीन इमारतीचा रविवारी कोनशिला समारंभ

0
20

जत : येथील नवीन न्यायालयीन इमारतीचा कोनशिला समारंभ रविवार दि. ५ मे रोजी होणार आहे, अशी माहिती जत बार असोसिएशनकडून माहिती देण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून न्यायमूर्ती भारती डांगरे या उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. के. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचे माजी अध्यक्ष मिलिंद थोबडे हे ही उपस्थित राहणार आहेत.जत येथील नवीन न्यायालयीन इमारतीची मागणी ही खूप वर्षांपासून होती.सुसज्ज अशी इमारत नसल्याने गैरसोय होत होती.

 

या नव्याने होणाऱ्या न्यायालयीन इमारतीमुळे पक्षकार, वकील व न्यायालयीन कर्मचारी यांची सोय होणार आहे. सद्यस्थितीतील न्यायालयीन इमारत ही खुप जुनी झालेली आहे. जत तालुका क्षेत्रफळाने मोठा असल्याने तालुक्यातील प्रलंबित खटल्यांची संख्या देखील जास्त आहे. पुरेशी इमारत उपलब्ध नसल्याने न्यायिक अधिकारी यांची संख्या कमी आहे. या सर्व बाबींचा विचार करून नवीन इमारत होणे गरजेचे होते. या इमारतीमुळे पक्षकार व वकील यांची गैरसोय होणार नाही.

 

यावेळी जत तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. शिवशंकर खटावे, उपाध्यक्ष राजकुमार म्हमाणे, अँड. साजिद सौदागर, अँड. रमेश मुंडेजा, अँड. अशोक निटवे, अँड. राहुल भोसले,अँड. एन. डी. गडदे,अँड. सुरेश घागरे,अँड.सागर व्हनमाने उपस्थित होते.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here