तम्मनगौडा रवीपाटील यांची माघार नाहीच,निवडणूक लढणार हे निश्चित !

0
383

सरपंच बसवराज पाटील यांची माहिती

जत तालुक्यात भूमीपुत्रच आमदार होणार हे नक्की आहे. काही विरोधक तमनगौडा रवी पाटील हे माघार घेणार असल्याच्या अफवा पसरवून मतदारांची दिशाभूल करत आहेत. परंतु असे काही होणार नाही. निवडणूक चिन्ह मिळाले की, रवी पाटील हे पूर्ण ताकतीने माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार असल्याचे प्रतिपादन माजी सरपंच बसवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी ओबीसी नेते हणमंत गडदे, ज्येष्ठ नेते तम्मा सगरे, सरपंच तानाजी पाटील, युवा नेते पिरू कोळी आदी उपस्थित होते.

माजी सरपंच बसवराज पाटील पुढे म्हणाले की, जत तालुक्यात आम्ही सर्व मतदारापर्यंत पोहोचलो आहे. स्वाभिमानी कार्यकर्ते, मतदारांचे आम्हाला विधानसभा निवडणुकीच्या पाठिंब्यासाठी फोन येत आहेत. आम्ही भाजप पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत प्रामाणिकपणे पोहचवली. परंतु वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला अंधारात ठेवत फसवले. आ. गोपीचंद पडळकर यांच्या सभेसाठी बाहेरून लोक आले, होते ही वस्तुस्थिती आहे. अशीच लोक आ. पडळकर यांच्या बारामती विधानसभा निवडणुकीसाठी जमले होते.तेथे त्यांचे डीपॉजिट जप्त झाले होते.जत तालुक्यातील मतदार हेच करणार आहेत.सरपंच तानाजी पाटील म्हणाले की, भाजपचे उमेदवार आ. पडळकर यांची ब्रेक नसलेली गाडी सामान्य जनतेचे नुकसान करणार आहे.

जनतेने आता ठरवले आहे की भूमिपुत्र रवी पाटील यांना सर्व बहुजन मतदार प्रचंड मतांनी निवडून देतील. ओबीसी नेते हणमंत गडदे म्हणाले की, तालुक्यात जातीचे राजकारण करणारे पडळकर यांनी राज्यातील धनगर समाजाला फसवले आहे. भाजपने प्रामाणिक काम करणाऱ्या रवी पाटील यांच्यावर अन्याय केला असून आम्ही त्या पक्षाचा निषेध करतो. आ. पडळकर यांनीच बिरोबाची शपथ घालून, यापूर्वीच सांगितले आहे की, भाजपला मतदान करू नका.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here