जिव्हाळा व्यापारी पतसंस्था जतची अर्थवाहिनी ठरावी ; प्रकाश जमदाडे | पहिला वर्धापन उत्साहात

0

जत,प्रतिनिधी : संपूर्ण महाराष्ट्रात कै. वसंतदादा पाटील यांनी सहकार क्षेत्राला उभारी देण्याचे मोठे काम केले.आज पतसंस्था सुस्थितीत असल्याने विशेषतः शहरी व ग्रामीण भागातील सहकार क्षेत्र भक्कम झाले आहे. सहकार क्षेत्रात पतसंस्थांनी विश्वासहर्ता कमावली तर राज्याच्या सहकार क्षेत्रात पतसंस्था दिशादर्शक ठरतील, असा विश्वास

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी

व्यक्त केला.जिव्हाळा व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या पहिल्या वर्धापनदिनी आयोजित कार्यक्रमात जमदाडे बोलत होते. यावेळी

Rate Card

जतचे तहसीलदार सचिन पाटील,पतसंस्थेचे चेअरमन डॉ. समाधान जगताप,व्हा.चेअरमन महेश मालगत्ते संचालक,महादेव जाधव,प्रमोद जमदाडे,विजय रूपनूर,सचिन माने,अनिता जाधव,शांताबाई माने,विजय शिंदे,अविनाश पोरे,अमोल गायकवाड,सोमनाथ स्वामी,सचिव अरूणा चव्हाण, सुजाता माने उपस्थित होत्या.यावेळी उल्लेखनीय काम करणाऱ्या सोमनाथ गोफने,शितल चव्हाण, अनिता जगताप,बाळासाहेब काशीद,संतू लोंखडे,राजकुमार शिंदे,तानाजी शिंदे,शंकर देवकते आदीचा सत्कार करण्यात आला. प्रकाश जमदाडे म्हणाले, जतमध्ये दुष्काळी परिस्थितीत पतसंस्था चालवणे आव्हान आहे.हे आव्हान समाधान जगताप व त्यांच्या टीमने पेलले आहे. जिव्हाळा ग्रुपवर विश्वास ठेवावा व त्यांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. तहसीलदार सचिन पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी विक्रम ढोणे, सुभाष चव्हाण,लिंबाजी सोलनकर,महादेव जाधव, शिवाजी आवटे, महेश शिंदे,कृष्णा देवकते, परवेज मणेर, प्रणाली चव्हाण, मनोज शिंदे, गोरखनाथ पवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविकेत बोलताना चेअमरन जगताप म्हणाले, सभासदांमध्ये काटकसर,स्वावलंबन व सहकार यांचा प्रसार करणे, सभासदांना बचतीची सवय लावून त्यांची आर्थिक उन्नती करणे व व्यापार वाढीस चालना देणे हेच जिव्हाळा पतसंस्थेचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. सूत्रसंचलन प्रकाश गुदळे यांनी, तर आभार संकपाळ यांनी मानले.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.