काँग्रेसच्यावतीने जत येथे मोदी-अदानी हटाओ, देश बचाओ हा नारा देत पोस्टकार्ड आंदोलन केले. देशात सर्वत्र लोकशाहीचे नाही तर हुकूमशाहीचे वातावरण आहे.काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याविरोधात आवाज उठवताच त्यांचा आवाज दाबण्याचे षडयंत्र रचले गेले. हे सर्व लोकशाहीस घातक आहे. देशविरोधी कारवाया करणाऱ्या शासनाला ठिकाणावर आणण्यासाठी आज मोदींना पत्रे पाठवण्यात आली आणि विविध प्रश्न विचारले आहेत,अशी माहिती आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सांगितले.
जत नगरपरिषदेला १ कोटीचा विकास निधी
सावंत म्हणाले,यामध्ये अदानींच्या आर्थिक भानगडींची आपण जेपीसी मार्फत चौकशी कधी पासून सुरू करणार ? केंद्र सरकार जेपीसी चौकशीपासून पळ का काढत आहे ? एसबीआय आणि एल आय सी ला अदानींच्या आर्थिक भानगडींमुळे जो धोका निर्माण झाला आहे, त्यातून बाहेर पडण्यासाठी काय उपाययोजना केली आहे ? निरव मोदी, ललित मोदी, मेहुल चौक्सी, विजय मल्ल्या यांना पकडून देशातील न्यायव्यवस्थेसमोर केव्हा हजर करणार ?
अच्छे दिन गौतम व विनोद अदानी यांना आले आहेत, सामान्य माणसांना अच्छे दिन कधी येणार? हे असे अनेक प्रश्न असून त्याची उत्तरे मिळालीच पाहिजेत यासाठी सदरचे आंदोलन केले. याप्रसंगी जत तालुका काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवा दल, NSUI चे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.