डफळापूर : इतिहासात अजमाअमर असलेल्या डफळापूरच्या भूमिपुत्राचे सलग चौथ्या टर्ममध्ये सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक पद निश्चित असल्याची माहिती सोसायटी संचालक बाळासाहेब चव्हाण यांनी दैनिक संकेत टाइम्सशी बोलताना दिली.स्व.सुनिलबापू चव्हाण यांचे चिरजिंव दिग्विजय चव्हाण यांच्या रूपाने यंदाही डफळापूरचा भूमिपुत्र जिल्ह्यात दुसरी सर्वात मोठी सहकारी संस्था असलेल्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक पद मिळण्याचे आतापर्यतच्या मतदारांच्या कलातून स्पष्ट होत आहे.
डफळापूर हे गाव ऐतिहासिक डफळे संस्थानची कर्मभूमी कर्तबगार सरदार चौव्हान घराण्याचे गाव म्हणून डफळापूरचा राज्याच्या इतिहासात उल्लेख आढळतो.राजकारणात स्व.सुनिलबापू चव्हाण यांनी या गावाचे गाव जिल्ह्यात चर्चेत आणले,जिल्हा परिषद,जिल्हा बँक,बाजार समिती,पंचायत समिती निवडणूकीत सुनिलबापूच्या नावाने डफळापूरचे वलंय तयार झाले आहे.ते आजही कायम असून त्यांच्या आकस्मिक निधनानंतर त्याचे चिरंजीव आता जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश करू पाहत आहेत.
यंदाच्या बाजार समिती निवडणूकीत ते भाजपा प्रणीत पँनेलमधून आर्थिक दुर्बल गटातून निवडणूकीच्या रिंगणात आहेत.त्यांनी पँनेलच्या नेते पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे,खा.संजयकाका पाटील,जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार विलासराव जगताप,जिल्हा बँक संचालक प्रकाश जमदाडे यांच्या नेतृत्वाखाली पँनेलचा जोरदार प्रचार सुरू केला आहे.भाजपा प्रणीत पँनेलला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने दिग्विजय चव्हाण यांच्यासह सर्व उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचेही बाळासाहेब चव्हाण यांनी सांगितले.
• बाजार समिती निवडणूक : जत भाजपकडून मोर्चेबांधणी,बैठकांना वेग | संग्राम जगताप यांच्या उमेदवारीला पांठिबा
दरम्यान दत्त पतसंस्थेचे चेअरमन असलेले बाबासाहेब माळी हेही महाविकास आघाडीच्या पँनेलमधून नशिब आजमावत असून त्यांचाही विजय निश्चित असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून दावा करण्यात आला आहे.दरम्यान गेल्या तीन टर्ममध्ये डफळापूरचा एकतरी भूमिपुत्र संचालक राहिला आहे.यंदाही ती परंपरा कायम राहणार आहे.
हेही वाचा..
• सांगली बाजार समिती निवडणूकीत नवा ट्विस्ट
• सांगलीत घरजागेच्या वादातून महिलेचा निर्घून खून
• जत येथील गणेश पतसंस्थेला १ कोटी ३४ लाख ढोबळ नफा