जतच्या काटा लढतीत कोन मारणार बाजी | आज मतमोजणी | जिल्हा बँक निवडणूक

0
Rate Card

सांगली : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी 23 रोजी होणार आहे.मिरजमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होईल.दुपारी साडेबारा ते एक वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत विकास महाआघाडीच्या तीन जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत.

 

 

जिल्ह्यातील २ हजार ५७३ पैकी २ हजार १९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आटपाडीत सर्वाधिक ९९.३८ टक्के तर सांगलीत सर्वात कमी ५३.२१ टक्के मतदान झाले. निवडणूक प्रचारात मतदारांच्या पळवापळवीच्या वादातून झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पार पडले.

 

 

बँकेच्या निवडणुकीत यंदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला होता. महाविकास आघाडीचे सहकार विकास पॅनेल, तर भाजपचे शेतकरी विकास पॅनेल रिंगणात होते. दोन्ही गटांकडून चुरशीने प्रचार झाला. त्यामुळे आता निकालाकडे लक्ष लागलं आहे. मतमोजणी मंगळवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी मिरज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकरी बचत भवनमध्ये होणार आहे.

 

 

 

दरम्यान, आमदार मोहनराव कदम, आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, बँकेचे विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष संग्रमसिंह देशमुख, विशाल पाटील, सत्यजित देशमुख, पृथ्वीराज पाटील यांच्यासह दिग्गजांचे भवितव्य आज ठरणार आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम होणार की भाजप महाविकास आघाडीला शह देण्यात यशस्वी होणार, हे या निकालातून स्पष्ट होणार आहे.

 

जतेतील काटा लढतीत कोन मारणार बाजी
जत तालुक्यात सोसायटी गटात आमदार विक्रमसिंह सांवत व रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांच्यात काटा लढत झाली आहे.दोन्ही बाजूने मतदारांना आपल्याकडे खेचण्यात प्रयत्न झाले आहेत.त्यामुळे या काटा लढतीत कोन बाजी मारणार हे दुपारी बारा नंतर स्पष्ट होणार आहे.त्याचबरोबर माजी सभापती मन्सूर खतीब व तम्मणगौडा रवीपाटील यांच्यातही सरळ सामना झाल्याने यातही कोन विजयी होणार याकडे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.