सध्या राज्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागात एनर्जी ड्रिंक्सच्या नावाखाली कॅफेनचे घटक असलेली थंडपेय बाजारात आली आहेत. पानटपरीवर सहज दहा-वीस रुपयांतही पेय मिळत आहेत.यातून सौम्य प्रकारची नशा होत असल्याने लहान मुले, महिला पुरुषही याच्या आहारी गेले आहेत.
सांगलीत घरजागेच्या वादातून महिलेचा निर्घून खून
सध्या शहर व ग्रामीण भागात किराणा दुकान,हॉटेल, पानटपन्या थंडपेयाची दुकानांचे कप्पे एनर्जी ड्रिंक्सच्या बाटल्यांनी खचाखच भरलेली दिसतात, तर सर्वत्र या रिकाम्या बाटल्यांचा खच दिसून येत आहे. सहज व कमी पैशात मिळत असल्याने लहान मुले याच्या आहारी गेले आहेत.उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीही रात्री झोप येऊ नये म्हणून याचा सहारा घेतला आहे.वाहनचालकही मोठ्या प्रमाणात याचं सेवन करत आहेत.
लहान मुले पार्टी करण्यासाठी या बाटल्या घेतात आणि दोन-तीन बाटल्या रिचवतात.याचं सेवन केल्यास झोप येत नाही तर शरीरात स्फूर्ती निर्माण होते. पिल्यानंतर बराच काळ डोळे ताठर होतात आणि बऱ्यापैकी गुंगी येते. तोंडाचाही वास येत नाही. आणि झिंगही चार तास राहते. त्यामुळे सध्या याचा धोका माहीत नसलेले याच्या आहारी गेले आहेत.
दोनशे पन्नास मि.लि.च्या बाटलीत ७५ मिली ग्रॅमपेक्षा जास्त कॅफेन घेऊ नये, अशी नोंदही या बाटलीवर आहे तर सूचनेत लहान मुले, गरोदर माता,स्तनदा माता यांना धोकादायक असल्याची स्पष्ट नोंद आहे. या बाटल्यांत प्रत्येक १०० मि. लि.ला २९ मिली ग्रॅम कॅफेन असल्याची नोंद आहे.मात्र या बाटल्या थेट २५० मिलीच्या आहेत, तर दिवसभरात पाचशे
मिलीपेक्षा जास्त घेऊ नये, असे स्पष्ट केले असले तरी या सहज उपलब्ध होत असलेल्या नशा गल्लोगल्ली मिळत असल्याने आता नवा धोका निर्माण झाला आहे. लहान मुलांच्या पालकांना आता सतर्क राहावे लागणार आहे.
आटपाडीत पिस्तूलसह तीन काडतुसे जप्त | स्कॉर्पिओसह,दोघांना अटक
कोणत्याही परिस्थितीत कॅफेन धोकादायक आहे. कॅफेन हे शंभर मिली ग्रॅमपेक्षा जास्त शरीरात गेल्यास जास्त नशा येते. मेंदू, किडनी, मज्जारज्जू निकामी होतो. गरोदर माता, स्तनपान करणाऱ्या मातांनी हे घेऊ नये बाळाला अपंगत्व किंवा मानसिक विकलांगता येते.थोड्या प्रमाणात जरी चार-पाच वेळा घेतले तरी त्याचे व्यसनच लागते.-डॉ. जगदीश वाबळे,एमडी मेडिसीन, संगमनेर
हेही वाचा.
• जतमधिल या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होणार मूत्रपिंडावरील आजारावर उपचार
• जत येथील गणेश पतसंस्थेला १ कोटी ३४ लाख ढोबळ नफा
• साठेखत नेमका काय आहे प्रकार ?,कसा मिळतो मालकीहक्क वाचा सविस्तर