सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत भाजपा अंतर्गत वाद संपण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे.एकीकडे माजी आमदार विलासराव जगताप यांची नाराजी दूर होताच, माजी तालुकाध्यक्ष सुनिल पवार यांनी आयात उमेदवारांचा भाजपात प्रवेश घ्या,अन्यथा आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही,असा पवित्रा घेतल्याने पेच निर्माण झाला आहे.
..अखेर विलासराव जगताप यांनी निर्णय बदलला,वाचा सविस्तर
सांगली मार्केट कमेटी निवडणुकीत सुनील पवारांची एन्ट्री झाली असूून भाजपच्या उमेदवार यादीवर त्यांनी जाहीर केली नाराजी व्यक्त केली आहे.भाजपचे माजी तालुकाध्यक्ष असलेले सुनील पवार यांनी फक्त संग्राम जगतापांचाच प्रचार करणार असल्याचे स्पष्ट करत,उमेदवारांसह पँनेल प्रमुखाच टेंशन वाढविले आहे.काँग्रेस, राष्ट्रवादीमधून आलेल्यांना केला कडाडून विरोध करत उमेदवारीसाठी भाजप पॅनेलमधून आलेल्यांनी प्रथम भाजपमध्ये जाहीर प्रवेश करावा मगच करणार त्यांचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
जतच्या भाजपा तालुकाध्यक्षाला उमेदवारी नाकारली,सांगली बाजार समिती निवडणुकीवर बहिष्कार- विलासराव जगताप
भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांची तलवार म्यान होताच सुनील पवारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीमधून आलेल्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्याने पेच निर्माण झाला आहे.जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, राष्ट्रवादीचे युवा नेते मोहन उर्फ भैय्या कुलकर्णी, काँग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, माजी सभापती संतोष पाटील यांनाच थेट सुनील पवार यांनी आव्हान देत त्यांचा प्रथम भाजपात प्रवेश घ्यावा,त्यानंतरच आम्ही प्रचार करणार अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत जतमध्ये पवारांमुळे पडला नवीन पेच पँनेलला अडचणी आणू शकतो.