जत तालुक्यातील दोड्डानाला येथील ओढ्यावरती पाणी उपसा करण्यास मनाई

0

सांगली : सांगली पाटबंधारे मंडळ सांगली विभागांतर्गत सद्यस्थितीत म्हैसाळ योजनेचे उन्हाळी पाणी आवर्तन सुरू असून जिल्हास्तरीय आकस्मिक पाणी  निश्चिती समितीने लघु पाटबंधारे तलाव दोड्डानाला पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित केला आहे. या समितीमार्फत मागणी केलेल्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई पाहता योजनेचा पाणी  विसर्ग सुरू असेपर्यंत पाणी पोहोचणे गरजेचे आहे.

 

 

याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकारानुसार सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मौजे व्हसपेठ, माडग्याळ, सोन्याळ, उटगी या ठिकाणी जत शाखा कालवा ते लघु पाटबंधारे तलाव दोड्डानाला येथील नाला / ओढ्यावरती दि. 3 मे 2024 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते 10 मे 2024 रोजीचे 23.00 वाजेपर्यंत पाणी उपसा करण्यास मनाई केली आहे.

 

Rate Card

हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.