बैलगाड्या शर्यतीचा थरार आता कुठे रंगत आली आहे.आता भाळवणीतील शर्यतीमुळे चर्चेला उधान आले असून देशातील मोठी भाळवणी (ता. खानापूर) येथे रविवारी (ता.9) सकाळी हा बैलगाडी शर्यतीचा थरार पहायला मिळणार असून कोणती बैलजोडी मालकाला ‘थार’ जीप मिळवून देणार याची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.रविवारी होणाऱ्या रुस्तुम ए हिंद, बैलगाडी शर्यतीचा थरार अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे.
खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील युथ फौंडेशनच्या वतीने देशातील या सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबीरात जी बैलगाडी शर्यतीमध्ये सहभागी होणार आहे,त्यांनी सहा जणांचे रक्तदान केल्यानंतरच शर्यतीमध्ये सहभाग दिला जाणार आहे.डबल महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार पाटील यांनी स्वतः रक्तदान करून शिबीरास प्रारंभ केला आहे. भाळवणी येथे रक्तदान शिबीरासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.
गुडन्यूज : राज्यातील बैलगाडी शर्यत आयोजकांवरील गुन्हे मागे घेणार,मंत्रिमंडळाचा निर्णय
अशी आगळीवेगळी बैलगाड़ी शर्यत देशात पहिलीच होत असून स्पर्धेबरोबर सामाजिक बांधिलकीही जपली जात आहे.रक्तदान शिबिरामुळे गरजूना या शिबिरात संकलन झालेल्या रक्ताचा उपयोग होणार असल्याने हे भविष्यात प्रेरणादायी ठरणार आहे.
विशेष म्हणजे या शर्यतीत प्रथम विजेत्या बैलगाडी मालकास महिंद्रा ‘थार’ जीप बक्षिस दिली जाणार आहे.
त्याचबरोबर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकास येणाऱ्या बैल गाडी मालकास ट्रॅक्टर,तर चौथ्या व पाचव्या क्रमांकासाठी मोटारसायकल, सहाव्या क्रमांकावरील बैलगाडीस ई बाईक बक्षिस म्हणून दिली आहे.त्याचबरोबर इतरही अनेक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.सहभागीं बैलगाडी मालकांना मानाची गदा व गुलाल दिला जाणार आहे.सर्वाधिक बक्षिस रकम असलेली ही भारतातील पहिलीच बैलगाडी स्पर्धा असणार आहे.
अररं शर्यत सोडून बैलगाडी पळाली कुठे..बघा व्हिडिओ
स्पर्धेसाठी भाळवणीतील डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील युथ
फौंडेशनचे कार्यकर्त्याकडून गतीने तयारी सुरु आहे.या स्पर्धेत महाराष्ट्रासह इतर राज्यातून स्पर्धक सहभागी होत आहेत.देशातील सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीचा थरार रविवारी सकाळी ९ वाजता म्हणजे आतापासून काही तासात अनुभवास येणार आहे.त्याचबरोबर महिंन्द्रा थार जीप कोण पटकावणार याचीही उत्सुकता शिगेला पोहचली आहे.या बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताने भाळवणी गाव चर्चेत आले आहे.आजपासूनच गावात स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बैलगाड्या दाखल होत आहेत.
हेही वाचा
• जतेत अवकाळीचे ढग; वादळाच्या तडाख्याची पुढील इतके दिवस शक्यता
• व्वा रे, पट्ट्या | महादेवाला नवस बोलताना अशी आरोळी कधी ऐकला का | व्हिडिओ